ज्ञानेश्वरी आणि विज्ञान

म्हणऊनि महाभारती जे नाही । ते नोहेचि लोकी तिही । ..

– ज्ञानेश्वरी अध्याय १ ला, ओवी ४७


ग्रंथराज श्रीज्ञानेश्वरीमध्ये अध्यात्मज्ञानासोबतच रसायन, भौतिक, जीवशास्त्र, तंत्रज्ञान, मानसशास्त्र, अंतराळशास्त्र, भूगर्भशास्त्र, धातुशास्त्र असे विविध विज्ञानाचे मूळ सिद्धांत संत ज्ञानेश्वर माउलींनी कथन केले आहेत. आधुनिक वैज्ञानिकांनी यापूर्वी लावलेले शोध, भविष्यात लागणारे शोध यांचे मूळ आपल्याला ज्ञानेश्वरी ग्रंथात बघायला मिळते. म्हणून नवीन पिढीने ज्ञानेश्वरी ग्रंथाचा, अध्यात्म-श्रद्धा यासोबतच, वैज्ञानिक दृष्टीकोनातून अभ्यास केल्यास अनेक समाजोपयोगी, लोककल्याणकारी आविष्कारांचे स्फुरण, प्रेरणा शक्य आहे. यादृष्टीने श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे माझे व्यक्तिगत चिंतन सुरु आहे. माझ्या नित्य-अभ्यासात जसजसे संदर्भ मिळतात, तसतसे अभ्यासू वाचकांसाठी मी इथे खालील पानावर अद्ययावत करत आहे.

चित्रपट सिद्धांत
जेथ हें संसारचित्र उमटे । तो मनोरूपु पटु फाटे ।
जैसें सरोवर आटे । मग प्रतिभा नाहीं ॥ ज्ञानेश्वरी ५-१५६॥

घड्याळाचा सिद्धांत
उपजे तें नाशे । नाशलें पुनरपि दिसे ।
हे घटिकायंत्र जैसें । परिभ्रमे गा ॥ ज्ञानेश्वरी २-१५९॥

पृथ्वी परिभ्रमण सिद्धांत
उदय-अस्ताचे प्रमाणे । जैसे न चालता सूर्याचे चालणे ।
तैसे नैष्कर्म्यत्व जाणे ।कर्मींचि असता ॥ ज्ञानेश्वरी ४-९९॥

जल-विद्युतनिर्मिती सिद्धांत
तया उदकाचेनि आवेशे । प्रगटले तेज लखलखीत दिसे ।
मग तया विजेमाजी असे । सलील कायी? ॥ ज्ञानेश्वरी ७-५८ ॥

गुरुत्वाकर्षण सिद्धांत
कां पवनें परमाणु उचलले । ते पृथ्वीपणावेगळे नाहीं केले ।
आणि माघौते जरी पडले । तरी पृथ्वीचिवरी ॥ ज्ञानेश्वरी ९-२५६ ॥

गतीचा सिद्धांत
आतां चेंडुवें भूमी हाणिजे । नव्हे तो हाता आणिजे ।
कीं शेतीं बीं विखुरिजे । परी पिकीं लक्ष ॥ ज्ञानेश्वरी १६-१०० ॥

स्लिपर कोच सिद्धांत
जैसें निद्रेचे सुख न मोडे । आणि मार्गु तरी बहुसाल सांडे ।
तैसें सोकासनां सांगडे । सोहपें होय ॥ ज्ञानेश्वरी ५-८ ॥

धातू मोल्डिंग कास्टिंग सिद्धांत
तातलिये मुसें । मेण निघोनि जाय जैसें ।
मग कोंदली राहे रसें । वोतलेनी ॥ ज्ञानेश्वरी ६-२४९॥

लोहकाम सिद्धांत
तेथ शरीरादिक दळवाडें । शरीरादिकां हेतुचि घडे ।
लोहकाम लोखंडें । निर्वाळिजे जैसें ॥ ज्ञानेश्वरी १८-३५९ ॥

जीवनिर्मितीचा सिद्धांत
आणि शुक्रशोणिताचा सांधा । मिळतां पांचांचा बांधा ।
वायुतत्त्व दशधा । एकचि जाहलें ॥ ज्ञानेश्वरी १३-१०६ ॥

परमाणू आणि भूगोल सिद्धांत
कां पृथ्वीये परमाणूंचा उगाणा घ्यावा । तरि भूगोलुचि काखे सुवावा ।
तैसा विस्तारु माझा पहावा । तरि जाणावें मातें ॥ ज्ञानेश्वरी १०-२६० ॥

सृष्टीच्या प्रसारणाचा सिद्धांत
मग तयागोळकांचे अंशांश । प्रसवती आदिसंकल्प असमसहास ।
हें असो ऐसी बहुवस । सृष्टी वाढे ॥ ज्ञानेश्वरी ८-२४॥

जलचक्र सिद्धांत
मी सूर्याचेनि वेषें । तपें तैं हें शोषे । पाठीं इंद्र होऊनि वर्षें
। तैं पुढती भरे ॥ ज्ञानेश्वरी ९-२९६ ॥

लोहचुंबकाचा सिद्धांत
भ्रामकाचेनि संगें । जैसें लोहो वेढा रिगे ।
तैसीं ईश्वरसत्तायोगें । चेष्टती भूतें ॥ ज्ञानेश्वरी १८-१३११ ॥
जड परि जवळिका । लोह चळे तरि चळो कां ।
कवणु शीणु भ्रामका । सन्निधानाचा ॥ ज्ञानेश्वरी ९-११६ ॥
नाना भ्रामकाचें सन्निधान । लोहो करी सचेतन ।
कां सूर्यसंगु जन । चेष्टवी गा ॥ ज्ञानेश्वरी १३-१३९ ॥
संसर्गें चेष्टिजे लोहें । परी लोह भ्रामकु नोहे ।
क्षेत्रक्षेत्रज्ञां आहे । तेतुला पाडु ॥ ज्ञानेश्वरी १३-११२३ ॥

मानसशास्त्राचा सिद्धांत
संकल्पें सृष्टी घडी । सवेंचि विकल्पूनि मोडी ।
मनोरथांच्या उतरंडी । उतरी रची ॥ ज्ञानेश्वरी १३-११४ ॥
गुरुस्नेहाचिये वृष्टी । मी पृथ्वी होईन तळवटीं ।
ऐसिया मनोरथांचिया सृष्टी । अनंता रची ॥ ज्ञानेश्वरी १३-४१४ ॥

अवकाशातील मंगळ तसेच इतर ग्रह, तारे, नक्षत्र संदर्भ
फुटोनि पडे तंव । मृग वाढवी हांव ।
परी न म्हणे ते माव । रोहिणीची ॥ ज्ञानेश्वरी १३-७०८ ॥
जैसीं अवघींचि नक्षत्रें वेंचावीं । ऐसी चाड उपजेल जैं जीवीं ।
तैं गगनाची बांधावी । लोथ जेवीं ॥ ज्ञानेश्वरी १०-२५९ ॥

क्रमशः ..

Leave a Reply 0

Your email address will not be published. Required fields are marked *