वाचावी ज्ञानेश्वरी ..
वाचावी ज्ञानेश्वरी । डोळा पहावी पंढरी ।।१।।
– संत जनाबाई
ज्ञान होय अज्ञानासी । ऐसा वर त्या टीकेसी ।।२।।
ज्ञान होय अति मुढा । अति मूर्ख त्या दगडा ।।३।।
वाचील जो कोणी । जनी त्यासी लोटांगणी ।।४।।
उपरोक्त अभंगात संत जनाबाई ज्ञानेश्वरीचे महात्म्य सांगतात. त्या म्हणतात, मनुष्याने आयुष्यात एकदातरी ज्ञानेश्वरी वाचवी व पंढरी पहावी. अज्ञानी मनुष्यालाही ज्ञान होइल असा त्या टीकेस वर आहे. श्रीमद्भग्वद्गीतेवरील ज्ञानेश्वरी ही टीका वाचल्याने मूढ म्हणजेच जड बुद्धि असेल त्यालाही ज्ञान होते आणि जो मूर्ख असेल म्हणजे ज्ञान असूनही योग्यप्रकारे वापरत नाही त्यालाही योग्य ज्ञान होते. शेवटी संत जनाबाई म्हणतात जो कोणी ज्ञानेश्वरी वाचेल त्याला मी लोटांगण घालते.